Pm Kisan Yojana : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रातील मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. हे हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा विसावा हप्ता वर्ग केला जाणार आहे.

पीएम किसान च्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये आज जमा केले जाणार आहेत. हा विसावा हप्ता देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्रातीलही लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कशी आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?
पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो.
खरे तर या योजनेचा मागील 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. दरम्यान आज 2 ऑगस्ट 2025 रोजी या योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात 19 वा हप्ता जमा झाला आणि जवळपास आता पाच महिन्यांनी या योजनेचा विसावा हप्ता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि नमो शेतकरी अंतर्गतही दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात. दरम्यान पीएम किसानचा हप्ता आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि येत्या काही दिवसांनी नमो किसानचा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा आहे.