शेतकऱ्यांच्या कामाचा मोबाईल नंबर ! पीएम किसानचा २१वा हप्ता आला नाही तर ‘या’ नंबरवर करा तक्रार

Published on -

Pm Kisan Yojana : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा २१ वा हप्ता नुकताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. याचा महाराष्ट्रातीलही लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. खरे तर पीएम किसान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना.

या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एका वर्षात तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. ऑगस्ट महिन्यात या योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता आणि त्यानंतर आता १९ नोव्हेंबर रोजी या योजनेचा २१ वा हफ्ता जमा करण्यात आला आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पैशांचे वितरण करण्यात आले आहे. हा हफ्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधील शेतकऱ्यांना तर आधीच २१ वा हप्ता देण्यात आला होता.

मात्र काल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला हफ्ता अजूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा २,००० रुपयांचा हप्ता अडकला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पण लाभाचा पैसा का अडकला आणि अशावेळी कोणती पावले उचलावीत, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पी एम किसान चा हप्ता मिळाला नाही तर कुठे तक्रार करावी लागते याबाबतही आज आपण माहिती पाहणार आहोत. आज आपण पीएम किसान चे टोल फ्री नंबर पाहणार आहोत जिथे शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसल्यास तक्रार दाखल करता येते. 

शेतकऱ्यांना कुठे तक्रार करता येणार?

पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही तर शेतकऱ्यांना तीन प्रकारे तक्रार दाखल करता येते. तुम्हाला जर ई-मेल द्वारे तक्रार करायची असेल तर तुम्ही पीएम किसान च्या [email protected], [email protected] या ई-मेल आयडीवर तुमची तक्रार दाखल करू शकता.

या ई-मेलवर तुमचे नाव, नोंदणी क्रमांक, समस्या आणि संबंधित माहिती नमूद करून तुम्हाला तो ईमेल शासनाकडे पाठवायचा आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही थेट हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता.

०११-२४३००६०६ किंवा १५५२६१ या पीएम किसानच्या हेल्पलाइनवर तुमचे तक्रार सोडवली जाईल. तसेच तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. १८००-११५-५२६ हा पीएम किसानचा अधिकृत टोल फ्री क्रमांक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News