पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Published on -

Pm Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM-KISAN) आतापर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष २२ व्या हप्त्याकडे लागले आहे. हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २ हजार रुपये) जमा केली जाते. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खते यासाठी ही मदत शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे.

मात्र, अलीकडच्या काळात या योजनेच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या. आधार क्रमांक, बँक खाते, जमिनीची नोंद, e-KYC अपूर्ण असणे यांसारख्या कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचा हप्ता मिळेल की नाही, याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

जर तुम्हाला पीएम किसानचा २२ वा हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासायचे असेल, तर लाभार्थी यादी आणि तुमचे स्टेटस तपासणे आवश्यक आहे. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सोप्या पद्धतीने माहिती पाहता येते.

लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. ‘Get Report’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

e-KYC प्रक्रिया कशी करावी?

pmkisan.gov.in या वेबसाइटवर ‘Farmers Corner’ मध्ये जाऊन ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. मोबाईलवर आलेला OTP भरल्यानंतर सबमिट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर e-KYC यशस्वी झाल्याचा संदेश मिळेल.

वेळेत e-KYC आणि आवश्यक तपासणी पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपले स्टेटस तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe