वर्ष 2025 शेतकऱ्यांसाठी ठरणार आर्थिक फायद्याचे! PM Kisan योजनेबाबत निर्मला सीतारामन करणार मोठी घोषणा

Tejas B Shelar
Published:
Pm Kisan Yojana News

Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना 36 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळाले नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात.

अशा तऱ्हेने आत्तापर्यंत एकूण 18 हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 36,000 रुपयाचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, आता या योजनेला पाच वर्षांहून अधिकचा काळ उलटला असल्याने आणि या योजनेची लोकप्रियता पाहता सरकार यामध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे.

येत्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी घोषणा होणार असे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील भागधारकांची बैठक घेतली.

अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या या बैठकीत या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्यात. पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबतही या प्रतिनिधींनी मोठी मागणी केली आहे. दीर्घ कालावधीसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे, कृषी उत्पादनांवरील कर कमी करणे आणि पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करणे अशा मागण्या या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केल्या.

दोन तास चाललेल्या या बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित आव्हाने सोडविण्याच्या उद्देशाने अनेक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांमध्ये आर्थिक दिलासा, बाजार सुधारणा आणि धोरणात्मक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

यामुळे आगामी काळात केंद्रातील सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे. पुढल्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची सध्याची 6000 रुपयांची रक्कम 12000 रुपये केली जाऊ शकते असा दावा आता होऊ लागला आहे.

यामुळे खरंच केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 12000 रुपयांपर्यंत वाढवतात का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe