Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातोय.
या योजनेच्या 21व्या हफ्त्या बाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जातो.

आतापर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 20 हफ्ते मिळाले आहेत. विसावा आता 2 ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. तसेच काही राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा 21वा हप्ता पण मिळालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू – काश्मीर या राज्यांमधील शेतकऱ्यांना याचा 21 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे.
या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच योजनेचे पैसे मिळाले आहेत. तर आता बाकीच्या राज्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच 21 वा हफ्ता मिळणार आहे.
कधी जमा होणार 19 वा हफ्ता?
मिळालेल्या माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या चार दिवसांनी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारकडून 21 वा हप्ता दिला जाणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा 21 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती.
यामुळे जोपर्यंत बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना दोन हजाराचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट होते. दरम्यान काल बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीए आघाडीने जबरदस्त बहुमत मिळवले आहे.
तसेच निकालानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने बिहार सह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान चा 21 वा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबरला या हप्त्याचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
दरम्यान पी एम किसान योजना ही एक अशी योजना आहे जी शेतकरी कुटुंबांसाठी लागू आहे. अर्थात या योजनेचा कुटुंबाला लाभ दिला जातो. यामुळे जर कुटुंबातील दोन सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर येत्या काळात एकाचा लाभ थांबवला जाणार आहे.













