पीएम मोदींकडे आहे फक्त 52 हजार रुपये कॅश ! कार, जमीन काहीच नाही; देशाच्या पंतप्रधानांची एकूण संपत्ती किती आहे?

एक चहा विकणारा सर्वसामान्य माणूस आज पंतप्रधान पदावर विराजमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठा संघर्ष केलाय. पण तुम्हाला पीएम मोदी यांच्या नावावर किती संपत्ती आहे याची माहिती आहे का ? नाही ना मग आज आपण याच बाबत जाणून घेणार आहोत. 

Published on -

PM Modi Net Worth : गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचा करिष्मा पाहायाला मिळाला. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या वेळी घवघवीत यश मिळाले. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता काबीज करता आली नाही पण आपल्या मित्र पक्षांच्या पाठिंब्याने भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा राहिला आहे. त्यांचे वडील चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आणि या कामात नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांना मदत करत असत. दरम्यान असाच संघर्ष करत-करत एक चहा विकणारा सर्वसाधारण माणूस देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला.

ते सुरुवातीला आरएसएस सोबत जोडले गेलेत. आरएसएस मध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडली. संघासोबत काम करत असतानाच त्यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीत उतरण्याची संधी देण्यात आली.

गुजरात मधून ते आमदार म्हणून निवडून आलेत मग गुजरातचे मुख्यमंत्री झालेत आणि 2014 मध्ये ते पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेत. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडील संपत्तीचा तपशील सार्वजनिक केला आहे.

लोकसभा निवडणुकी वेळी भारतीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर किती संपत्ती आहे याची माहिती समोर आली आहे. 

 पीएम मोदी यांची एकूण संपत्ती किती?

 लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार पीएम मोदी यांच्याकडे तीन कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि गुंतवणूकीचा समावेश आहे.

या प्रतिज्ञापत्रानुसार पीएम मोदी यांच्याकडे 50 हजाराच्या आसपास कॅश आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे 52 हजार 920 रुपये इतकी कॅश होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या नावावर कोणतीच जमीन नाही. तसेच त्यांनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूक केलेली नाही.

पण मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत सुमारे 2.67 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 9.12 लाख रुपये गुंतवले आहेत. तसेच बँकेच्या एफडी योजनांमध्ये त्यांनी 2.85 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.

PM मोदींच मागील 5 वर्षाचं उत्पन्न किती? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गेल्या 5 वर्षांच्या उत्पन्नाची माहिती सुद्धा देण्यात आली होती. यात त्यांनी असे सांगितले होते की, 2018-19 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न अकरा लाख 14 हजार 230 रुपये होते.

2019-20 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 17 लाख 20 हजार 760 रुपये होते. 2020-21 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 17 लाख 7 हजार 930 रुपये होते. 2021 – 22 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 15 लाख 41 हजार 870 रुपये होते. 2022 – 23 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 23 लाख 56 हजार 80 रुपये इतके होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!