केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! देशातील आणखी 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन, ‘या’ वेबसाईटवर अर्ज करावा लागणार

Published on -

Pm Ujjwala Yojana : मोदी सरकारने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आत्तापर्यंत महिलांसाठी अनेक निर्णय घेतलेत. पीएम उज्वला, लखपती दीदी, पीएम मातृत्व वंदना अशा असंख्य योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

आता यातीलच पीएम उज्वला योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आणखी 25 लाख मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2050 रुपयांचा खर्च करणार आहे. या निर्णयामुळे पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 106 दशलक्ष होणार आहे.

पीएम उज्वला योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना एक एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर संबंधित उपकरणे मोफत दिले जाणार आहेत.

तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस रिफील साठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. गॅस रिफीलसाठी लाभार्थ्यांना तीनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे. म्हणजेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 553 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळते.

दुसऱ्या सामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर 853 रुपयांना मिळत आहे. सरकारने पीएम उज्वला योजना 2.0 राबवण्यास मंजुरी दिली असून याचा लाभ गरीब आणि गरजवंत महिलांना दिला जाणार आहे.

गरीब कुटुंबातील, अनुसूचित जाती आणि जमातीतील प्रौढ महिला ज्यांच्या घरी एलपीजी कनेक्शन नाही त्यांना या अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नक्कीच देशभरातील लाखो महिलांसाठी ही नवरात्र उत्सवाची एक खास भेट ठरणार आहे. पीएम उज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खाते द्यावे लागणार आहे.

ज्या महिलांच्या नावावर आधीच गॅस कनेक्शन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. आधीच पीएम उज्वला योजनेचा लाभ घेतलेला महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाही. https://pmuy.gov.in/e-kyc.html या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक महिलांना अर्ज सादर करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe