PNB FD News : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफ डी योजनेत आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना प्राधान्य दाखवत आहेत. दरम्यान जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे.
विशेषता ज्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या एफ डी योजनेत पैसा गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 2 हजार दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

ही बँक आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करत आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी दोन हजार दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केले आहे. जी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते.
बँकेने 2,000 दिवसांच्या मुदत ठेव योजनेंतर्गत आकर्षक व्याजदर जाहीर केला असून, यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगला परतावा मिळण्याची संधी आहे. आता आपण या योजनेचे सध्याचे व्याजदर आणि यामध्ये चार लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याबाबतचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
कसे आहेत व्याजदर
जर कोणी या योजनेत 4 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल, तर ठरावीक व्याजदरानुसार मुदतीच्या शेवटी त्याला मोठा परतावा मिळेल. बँकेने या योजनेवर साधारणतः 7.25% वार्षिक व्याजदर लागू केला आहे.
या दरानुसार 2,000 दिवसांनी म्हणजेच जवळपास 5.5 वर्षांनी गुंतवणूकदाराला अंदाजे 6.20 लाख रुपये मिळू शकतात. ही एफडी योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायद्याची ठरू शकते, कारण त्यांना अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळतो.
PNBच्या या विशेष योजनेमुळे सुरक्षित आणि निश्चित परताव्याची हमी मिळत असल्याने मध्यम अन दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
देशातील व्याजदरातील चढ-उतार आणि आर्थिक स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, निश्चित परतावा मिळवण्यासाठी अशा योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे, जे ग्राहक दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत, त्यांनी या योजनेचा विचार करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नक्कीच जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेची 2000 दिवसांची एफडी योजना फायदेशीर ठरणार आहे.