PNB FD Scheme : आरबीआय ने नुकताच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी काळात फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक प्रमुख बँकांकडून फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरात लवकरच कपात केली जाऊ शकते अशी शक्यता आता जाणकारांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
आरबीआय ने पाच वर्षांनी रेपोरेट कमी केले आहेत. आधी रेपो रेट 6.50% इतके होते मात्र यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात झाली आहे. अर्थातच रेपो रेट आता 6.25% इतके झाले आहेत.
![PNB FD Scheme](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/PNB-FD-Scheme.jpeg)
दरम्यान आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरात देखील कपात होणार आहे आणि यामुळे फिक्स डिपॉझिट मधील व्याजदर कमी होण्याआधीच गुंतवणूकदारांनी एफ डी मध्ये पैसा लावायचा असेल तर लावून टाकावा असे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या एका एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. पंजाब नॅशनल बँक 1894 दिवसांची एक योग्य योजना राबवत असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज दिले जाते.
कसे आहेत व्याजदर?
पंजाब नॅशनल बँक पाच वर्षांपेक्षा अधिक ते 1894 दिवसाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.50% दराने व्याज देत आहे. तसेच याच कालावधीच्या एफ डी वर जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.30 टक्के दराने व्याज दिले जात आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.80% अधिकचे व्याज दिले जात आहे.
कसे मिळणार एक लाख 82 हजार दोनशे रुपयांचे व्याज?
जर एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने 1894 दिवसांच्या एफडी योजनेत चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.30% दराने मॅच्युरिटी वर पाच लाख 82 हजार 220 रुपये मिळणार आहेत.
सिनिअर सिटीजन ग्राहकाचे चार लाख रुपयांची गुंतवणुकीची रक्कम वजा केली असता सदर ग्राहकाला एक लाख 82 हजार 220 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
तसेच जर याच कालावधीच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने चार लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला 6.50% दराने पाच लाख 58 हजार 939 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये त्याची चार लाखाची गुंतवणूक मायनस केली असता सदर गुंतवणूकदाराला एक लाख 58 हजार 939 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.