PNB FD Scheme : तुम्हालाही एफडी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना सरकारी बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जसं की आपणास माहीतच आहे की आरबीआयने अलीकडेच पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय जाहीर केले. यात रिझर्व बँक ऑफ इंडिया ने पुन्हा एकदा रेपो रेट मध्ये कपात करण्याचा एका ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये यावेळी ०.५० बेसिस पॉईंट कपात केली आहे.

आता साहजिक याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदरांवर आणि गुंतवणूकदारांच्या बचत योजनांवर पडणार आहे. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा आनंद असला तरी एफडीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर देशातील मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने अद्याप आपल्या एफडी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, लवकरच कपात होऊ शकते, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
सध्या पीएनबी ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ३.००% ते ७.३०% पर्यंत व्याज देत आहे. यामध्ये ३९० दिवसांची एफडी हा सर्वाधिक लोकप्रिय पर्याय ठरत असून साधारण नागरिकांना ६.५०%, ज्येष्ठ नागरिकांना ७.००%, तर अति ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% इतका सर्वाधिक व्याजदर मिळत आहे.
३ वर्षांच्या एफडीवर साधारण नागरिकांना ६.४०%, ज्येष्ठ नागरिकांना ६.९०%, आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.००% व्याज देण्यात येत आहे. बाजारातील परिस्थिती आणि रेपो दरातील बदल पाहता, पीएनबी लवकरच एफडी दरांमध्ये कपात करू शकते.
त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सध्याचे उच्च दर कायम असताना एफडी बुक करणे हा स्मार्ट पर्याय ठरू शकतो. विशेषतः ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर आकर्षक मानले जात आहेत.
१ लाख रुपयांवर किती परतावा?
जर गुंतवणूकदाराने तीन वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीवेळी साधारण नागरिकाला १,२०,९८३ रुपये, ज्येष्ठ नागरिकाला १,२२,७८१ रुपये, तर अति ज्येष्ठ नागरिकाला १,२३,८७२ रुपये मिळतील. म्हणजेच निश्चित व्याज म्हणून अनुक्रमे २०,९८३ रुपये, २२,७८१ रुपये, आणि २३,८७२ रुपये असा परतावा मिळणार आहे. सध्याच्या घडीला आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत पीएनबीची ही योजना गुंतवणूकदारांना निश्चित आणि स्थिर परतावा देणारी ठरू शकते. आरबीआयच्या निर्णयांचा परिणाम लवकरच बाजारात दिसू शकतो. त्यामुळे एफडी व्याजदरांमध्ये अपेक्षित कपात होण्यापूर्वीच गुंतवणूक करण्याचा विचार अनेक गुंतवणूकदार करत आहेत. फायदेशीर ठरणाऱ्या या दरांचा लाभ घेण्यासाठी हा योग्य काळ असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.













