PNB Home Loan : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे, खरेतर, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून या बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना होम लोन सुद्धा परवडणाऱ्या व्याज दरात उपलब्ध करून देते. अलीकडे आरबीआयने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे आणि आरबीआयच्या निर्णयानंतर पंजाब नॅशनल बँकेने सुद्धा होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती. यानंतर या चालू आर्थिक वर्षात आरबीआयने आतापर्यंत रेपो रेट 0.75% कमी केले आहेत.
म्हणजेच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे देशातील प्रमुख बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याज दरात देखील मोठी कपात केली आहे.
PNB चे Home Loan चे व्याजदर कसे आहेत?
आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांना किमान 7.45 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र बँकेचा हा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या किमान व्याजदराचा फायदा मिळू शकतो.
चाळीस लाखांच्या होम लोन साठी किती पगार हवा?
मीडिया रिपोर्टनुसार महिन्याचा पगार जर 56 हजार रुपये असेल तर अशा ग्राहकाला बँकेकडून तीस वर्षांसाठी चाळीस लाख रुपयांचे होम लोन उपलब्ध करून दिले जाऊ शकते.
जर समजा पंजाब नॅशनल बँकेकडून तीस वर्ष कालावधीसाठी 40 लाख रुपयांचे होम लोन किमान 7.45% इंटरेस्ट रेटवर उपलब्ध झाले तर अशा ग्राहकाला 28 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
अशा प्रकरणात सदर ग्राहकाला होम लोनची मुद्दल रक्कम आणि व्याज असे एकूण एक कोटी 80 हजार रुपये द्यावे लागतील. म्हणजे निव्वळ व्याज म्हणून साधना 60 लाख 80 हजार रुपये द्यावे लागतील.