ट्रॅफिक जॅम विसरा, सुरु होणार हवेत तरंगणारी टॅक्सी ! मुंबई नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार पॉड टॅक्सी, रूट पण ठरला

Published on -

Pod Taxi In Maharashtra : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे सारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान राज्यातील या प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ठाणे शहरात आता हवेत तरंगणारी टॅक्सी सुरू होणार आहे. हो, ठाणे शहरात पॉड टॅक्सीची सेवा सुरू होणार आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भातील सादरीकरण देखील नुकतेच संपन्न झाले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण झाले असून लवकरच ठाण्यात पॉड टॅक्सीची सेवा सुरू होणार आहे. सर्वप्रथम हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया यामध्ये खर्च केला जाणार नाही.

दरम्यान आता आपण याचं पॉड टॅक्सी बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठाण्यातील कोणत्या रूटवर ही सेवा सुरू होणार याबाबतही आपण माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पॉड टॅक्सी ?

पॉड टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे. या टॅक्सीचा ताशी वेग हा 60 ते 70 किमी एवढा असणार आहे अन यातून 16 प्रवासी एका वेळेस जाऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे.

ही टॅक्सी चालवण्यासाठी सिमेंटचे गर्डर टाकले जातील, याचे व्हील आणि ट्रॅक हे स्टीलचे असतील अशी माहिती समोर आली आहे. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे, अन या स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी आता पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे.

खरे तर सध्या या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळतं आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आता शासनाकडून ठाणे शहरात पॉड टॅक्सी सुरु केली जाणार आहे. पॉड टॅक्सीची हवाई वाहतूक सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे.

कोणत्या रूटवर धावणार ?

मिळालेल्या माहितीनुसार पॉड टॅक्सीची सेवा मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील 60 मीटर रस्त्यावर चालवली जाणार आहे.

तसेच, भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमी रस्त्यावर ही टॅक्सी चालवली जाणार आहे. या रस्त्याच्या 40 मीटर वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe