पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेताय का ? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

सध्या दहावी आणि बारावीचे विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. 10वी आणि बारावीनंतर अनेक विद्यार्थी पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्ही ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

Published on -

Polytechnic Admission Process : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी 2025-26 शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

महत्वाची बाब अशी की तंत्रशिक्षण संचालनालयाने यासंदर्भात अधिकृत सुधारित वेळापत्रक सुद्धा जाहीर केले आहे आणि आज आपण पॉलिटेक्निक प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक कसं आहे हे जाणून घेणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचे आहे असे इच्छुक विद्यार्थी गेल्या दहा दिवसांपासून अर्ज करत आहेत. 20 मे ते 16 जून 2025 या कालावधीत इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे.

dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ई-स्क्रूटनी प्रणालीतून कागदपत्र पडताळणीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. अर्ज सादर केल्यानंतर ती निश्चित करण्याची प्रक्रिया देखील याच कालावधीत पार पडेल अशी माहिती यावेळी समोर आली आहे.

या प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जून रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यावरील हरकती 19 ते 21 जूनदरम्यान स्वीकारल्या जाणार आहेत. शिवाय याची अंतिम गुणवत्ता यादी 23 जून 2025 रोजी जाहीर केली जाणार असे सांगितले गेले आहे.

खरेतर, दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला या शाखांमध्ये प्रवेश घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

म्हणूनचं इच्छुकांनी वेळेआधी अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आता आपण पॉलिटेक्निकलला ऍडमिशन घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोण – कोणत्या कागदपत्र सादर करावी लागणार ? याची माहिती जाणून घेणार आहोत.

ही कागदपत्रे सादर करावी लागणार

अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक पासबुक आणि इतर तपशील

संरक्षण सेवा / अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र

दिव्यांग विद्यार्थी असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र

इनकम सर्टिफिकेट

नॉन क्रिमीलेअर किंवा वय – अधिवास प्रमाणपत्र

विद्यार्थी अनाथ असल्यास अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र

इकॉनोमिकल विकर सेक्शन म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी असल्यास तसे प्रमाणपत्र

विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातून जसे की अनुसूचित जाती आणि जमाती मधील असल्यास कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe