Post Office च्या 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2,00,000 गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

बँकांच्या एफडी योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत असणाऱ्या गुंतवणूकदारांना अलीकडील काही महिन्यांमध्ये मोठा फटका बसलाय. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या एफडी योजनेचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

Published on -

Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना आणत असते. दरम्यान , अलीकडील काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केलेली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी नागरिकांकडून पोस्ट ऑफिसला अधिक प्राधान्य दिले जात आहे. कारण की पोस्ट ऑफिसचे व्याजदर अजूनही कायम आहेत.

आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आणि या कपातीनंतर देशातील प्रमुख बँकांनी एफडी व्याजदर सुद्धा कमी केलेत. पण पोस्ट ऑफिसने अजूनही आपल्या कोणत्याच बचत योजनेचे व्याजदर कमी केलेले नाहीत. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर सुद्धा अजूनही कायमच आहेत. म्हणूनच आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. 

कशी आहे पोस्टाची एफडी योजना 

खरे तर, पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना म्हणजेच टीडी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेसारखे आहे. या योजनेत ग्राहकांना किमान एक हजार रुपयांपासून एक रकमी गुंतवणूक करता येते. येथे कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही.

ग्राहकांना हवा तेवढा पैसा या योजनेत गुंतवता येतो. महत्त्वाची बाब म्हणजे पोस्टाची एफडी योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीची आहे. यातील एका वर्षाच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने,

तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने परतावा दिला जातोय. पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट योजनेची किंवा एफडी योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे, या योजनेत केलेल्या गुंतवणुकीला सरकारकडून हमी दिली जाते.

म्हणूनच सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या एफडी योजनेत अधिक प्राधान्य दिले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बँकांच्या तुलनेत पोस्टाकडून एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण पोस्टाच्या एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केल्यास त्यांना किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार 

पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर सध्याच्या 6.9% दराने सदर गुंतवणूकदाराला दोन लाख 14 हजार 161 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच 14,161 व्याज स्वरूपात सदर गुंतवणूकदाराला रिटर्न मिळतील.

पोस्टाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर सध्याच्या सात टक्के दराने गुंतवणूकदाराला दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळतील म्हणजेच 29,776 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील. 

पोस्टाच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर सध्याच्या 7.10% दराने दोन लाख 47 हजार 15 रुपये मिळतील म्हणजेच 47 हजार 15 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर सध्याच्या 7.50% दराने दोन लाख 89,990 रुपये मिळतील म्हणजेच 89 हजार 990 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!