पोस्ट ऑफिसच्या ‘या’ एफडी मध्ये 5 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 15 लाखांचे रिटर्न !

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास राहणार आहे. कारण की, आज आपण पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेची म्हणजेच एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर, खाजगी सरकारी बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस कडूनही एफडी योजना ऑफर केली जात आहे.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात.

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप अगदीच बँकांच्या योग्य योजनेप्रमाणे आहे आणि यामुळेच याला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते.

पोस्टाची ही टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. दरम्यान आता आपण पोस्टाच्या FD योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांची रक्कम कशी तिप्पट होणार याचे गणित समजून घेणार आहोत.

पोस्टाच्या एफडी योजनेत 5 लाखाची गुंतवणूक केल्यास कसे 15 लाखांचे रिटर्न मिळणार ? याचे कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात.

पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेचे व्याजदर वेगवेगळे आहेत.

पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने व्याज दिले जात आहे. दोन वर्षांच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7% दराने व्याज दिले जात आहे.

तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. तसेच पाच वर्षांचा FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.

5 लाखाचे 15 लाख कसे होणार?

पोस्ट ऑफिसच्या FD मध्ये आपले पैसे तिप्पट करायचे असतील तर आपल्याला 5 वर्षांच्या एफडीचा पर्याय निवडायचा आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.5% दराने व्याज दिले जात आहे.

दरम्यान जर तुम्हाला या एफडी योजनेत तुमचा पैसा तिप्पट करायचा असेल या योजनेतील गुंतवणूक दोन वेळा एक्स्टेंड करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला 15 वर्ष या योजनेत तुमची रक्कम गुंतवावी लागणार आहे.

जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले आणि ही रक्कम पंधरा वर्षांसाठी गुंतवून ठेवली तर तुम्हाला पंधरा वर्षांनी 15 लाख 24 हजार 149 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच तुम्हाला व्याज म्हणून 10 लाख 24 हजार 149 रुपये मिळणार आहेत. अर्थातच मूळ रक्कम पेक्षा दुप्पट व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!