Post Office FD Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, देशात सुरक्षित गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
बँकेची एफडी योजना आणि पोस्टाची एफडी योजना हे देखील असेच फायदेशीर पर्याय आहेत. खरे तर, रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेपो दरात मोठ्या प्रमाणात कपात केली.

आरबीआयकडून रेपो दर 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. सध्या आरबीआयचे रेपो रेट 6% इतके आहेत जे की आधी 6.50% एवढे होते. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील कर्जदार लोकांना फायदा झाला.
कारण की होम लोन सहित सर्वोच्च प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली. एसबीआय सह सर्वच बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली. पण, यासोबतच बँकांनी एफडी व्याजदरात देखील मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे.
मात्र आजही पोस्ट ऑफिसचे एफडी व्याजदर कायम आहेत. त्यामुळे जर तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये तुमचा पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची एफडी योजना सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.
कशी आहे पोस्टाची एफडी योजना?
पोस्ट ऑफिसकडून मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेली नाही मात्र पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेलाच पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते. कारण म्हणजे या योजनेचे स्वरूप अगदीच बँकांच्या एफडी योजनांप्रमाणे आहे.
दरम्यान पोस्टाच्या या एफडी योजनेत म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेत ग्राहकांकडून जबरदस्त गुंतवणूक सुरू आहे. पोस्ट ऑफिस कडून एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के, तीन वर्षांच्या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% आणि पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांच्या एफडी योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
खरे तर बँकांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना लागू असणाऱ्या व्याजदरात बदल असतो. बँकांकडून ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचे व्याज दिले जात आहे.
परंतु पोस्ट ऑफिस मध्ये सामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना समान व्याजदर लागू असते. दरम्यान जर पोस्टाच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत एखाद्या ग्राहकाने पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.10% दराने तीन वर्षानंतर सहा लाख 17 हजार 538 रुपये रिटर्न मिळणार आहेत. म्हणजेच एक लाख 17 हजार 538 रुपये तीन वर्षांच्या काळात व्याज म्हणून मिळतील.