पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4,000 रुपये गुंतवा आणि 60 महिन्यांनी 2,85,459 रुपये मिळवा, कस पहा संपूर्ण गणित

तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे का ? मग आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या एका भन्नाट योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे दरमहा 4 हजाराची गुंतवणूक केल्यास लखपती होता येणार आहे. 

Updated on -

Post Office RD Yojana : आपल्या भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे कोणाला नाही वाटत. प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. दरम्यान जर तुम्हालाही तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवायचे असेल आणि यासाठी तुम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नसेल तर आजची बातमी खास तुमच्या कामाची राहणार आहे.

खरंतर आपल्याकडे सुरक्षित गुंतवणुकीला फार आधीपासूनच महत्त्व दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवतात. अलीकडे मात्र बँकांनी आपल्या एफडी योजनेचे व्याजदर कमी केले आहे.

कारण म्हणजे आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केलीये. पण आजही पोस्ट ऑफिस कडून आपल्या बचत योजनांवर चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये चार हजार रुपयांची गुंतवणूक करून अवघ्या काही महिन्यांनी पावणेतीन लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळणार आहे. 

ही आहे पोस्टाची भन्नाट योजना

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्टाची आरडी योजना. पोस्टाच्या आरडी योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवली जाते आणि यावर पोस्टाकडून एक निश्चित दराने व्याज विकले जाते.

महत्त्वाची बाब अशी की ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजेच या ठिकाणी गुंतवलेला पैसा वाया जाणार नाही. स्वतः भारत सरकार या योजनेला सुरक्षा प्रदान करते. पोस्टाच्या आरडी योजनेत पोस्टकडून दर तिमाहीला व्याज दिले जात आहे.

तसेच योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्रितरित्या गुंतवणूकदाराला दिली जाते. पोस्टाच्या सात महिन्यांच्या आरडी योजनेत सध्या स्थितीला 6.7% दराने व्याज दिले जात आहे.

जे की दर तिमाहीला कंपाऊंड केलं जातं म्हणजेच यावर तिमाही आधारावर चक्रवाढ व्याजेचा सुद्धा फायदा मिळतो. आता आपण पोस्टाच्या 5 वर्षांचा आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला 4,000 ची गुंतवणूक केली तर योजना पूर्ण झाल्यानंतर किती पैसे मिळणार ? याचा आढावा घेणार आहोत. 

दरमहा चार हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार 

पोस्टाच्या आरडी योजनेत दर महा 4000 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी म्हणजेच पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला 2,85,459 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक दोन लाख 40 हजार रुपये एवढी राहणार आहे तर उर्वरित रक्कम म्हणजेच 45 हजार 459 त्याला व्याज म्हणून मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे कॅल्क्युलेशन पोस्टाच्या आरडी योजनेच्या सध्याच्या व्याजदरानुसार म्हणजेच 6.7 टक्के व्याज दरानुसार करण्यात आले आहे. जेव्हा या योजनेचे व्याजदर चेंज होईल तेव्हा हे कॅल्क्युलेशन सुद्धा बदलू शकते.

पोस्टाच्या आरडी योजनेत खाते कसे उघडणार?

पोस्टाच्या आरडी योजनेत अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे. पोस्ट ऑफिसला भेट दिल्यानंतर तुम्हाला या योजनेचा  अर्ज भरावा लागेल.

अर्ज सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा द्यावी लागणार आहेत. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो द्यावे लागणार आहेत. जर आधीपासून पोस्ट ऑफिस पासबुक असेल तर या योजनेत गुंतवणूक करणे अधिक सोपे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!