Post Office Scheme 2025 : मंडळी, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. आज आपण पोस्टाने महिलांसाठी सुरू केलेल्या एका विशेष योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस कडून गुंतवणुकीसाठी विविध बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पोस्ट ऑफिसने सुरु केलेल्या बचत योजनांमध्ये बँकेच्या एफडी योजनांपेक्षा अधिकचे व्याज मिळतं आहे, हेच कारण आहे की, अलीकडे बँकेच्या एफडी योजनांपेक्षा पोस्टाच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होतांना दिसते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांना विशेष प्राधान्य दाखवले जाते.
महिला आणि ज्येष्ठ नागरिक इथे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात अन यामुळेचं पोस्ट ऑफिसने महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरु केलीये. या योजनेमुळे महिलांना कमी काळात चांगला फायदा मिळतोय, अन हेच कारण आहे की या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. दरम्यान आज आपण महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो भारत सरकारने पोस्ट ऑफिस अंतर्गत एक योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 वर्षांच्या आत लाखो रुपये मिळतात. कमी काळात अधिकचा फायदा देणारी ही योजना फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे नाव देण्यात आले असून ही योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देते.
सध्या, ही योजना बँकेच्या दोन वर्षांच्या एफडीच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदराने परतावा देत आहे. म्हणून या योजनेला एफडी पेक्षा अधिक परतावा देणारी योजना म्हणून ओळखले जाते. पण ही योजना लिमिटेड टाईम पिरियड साठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2025 आहे. या योजनेंतर्गत पालक हे महिला आणि अल्पवयीन मुलीच्या नावे पैसे जमा करु शकतात.
या योजनेत कुठलीच वयोमर्यादा नाही, म्हणजे कोणत्याही वयाची महिला किंवा मुलगी यामध्ये गुंतवणूक करू शकते. कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी यात गुंतवणूक करू शकते. या योजनेच्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% व्याजदराने परतावा दिला जात आहे.
या योजनेवर सध्या दिले जाणारे व्याज हे 2 वर्षांच्या बँक एफडीपेक्षा जास्त आहे. कारण की SBI च्या दोन वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 6.80 टक्के दराने व्याज दिले जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.30 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे, HDFC बँक सामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दराने व्याज ऑफर करते. Axis Bank सुद्धा सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदराने परतावा देत आहे.
एवढेच नाही तर पोस्टाची एफडी योजना देखील म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या 2 वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेतही सात टक्के दरानेच परतावा दिला जातोय. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे व्याजदर हे महिलांसाठी फारच फायदेशीर आहेत. या योजनेत महिलांना किमान एक हजार रुपयांपासून कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते.
तसेच एक अकाउंट ओपन केल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरे अकाउंट ओपन करता येते. म्हणजेच जर एखाद्या महिलेने या योजनेत आज एक अकाउंट ओपन केले आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर आणखी तीन महिन्यांनी सदर महिलेला आणखी एक अकाउंट ओपन करता येईल आणि त्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. पण मंडळी जर नियमांचे उल्लंघन करून या योजनेचे खाते उघडले गेले तर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात इतकेच व्याज मिळणार आहे, म्हणून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
समजा एखाद्या महिलेने या योजनेत अकाउंट ओपन केले आणि दोन लाख रुपये गुंतवलेत तर त्या महिलेला दोन वर्षांनी दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच व्याज म्हणून 32 हजार 44 रुपये रिटर्न मिळतील. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एका वर्षानंतर या खात्यातून पैसे काढायचे असतील, तर खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता.