Post Office ची फुल टू पैसा वसूल योजना ! 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 35 लाखांचा परतावा, ही योजना ठरणार गेमचेंजर

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी पोस्टाची एक योजना फायद्याची राहणार आहे. आज आपण अशा एका योजनेची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये दररोज 50 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 35 लाखांचे रिटर्न मिळणार आहेत.

Published on -

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजना नागरिकांसाठी फारच फायद्याच्या ठरत आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. पोस्टाकडून टाईम डिपॉझिट योजनेसारख्या असंख्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्याच्या माध्यमातून गुंतवणूकदार चांगले पैसे कमवत आहेत.

दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशा एका फुल टू पैसा वसूल योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये पन्नास रुपयांची गुंतवणूक केल्यासही ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न मिळतात.

ही आहे पोस्टाची भन्नाट योजना

आम्ही पोस्टाच्या ज्या भन्नाट योजनेबाबत बोलत आहोत ती आहे ग्राम सुरक्षा योजना. ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली असून यामध्ये दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करूनही गुंतवणूकदार 35 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न मिळवू शकतात.

या योजनेचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी पूर्ण पैसे दिले जातात. जर समजा या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचा 80 वर्षाच्या आधीच मृत्यू झाला तर अशा प्रकरणात त्याच्या वारसाला या योजनेतून दिली जाणारी रक्कम परत मिळते.

या योजनेत 19 ते 55 वर्षे वयोगटातील नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. 19 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना यात गुंतवणूक करता येत नाही. या योजनेचा हप्ता, मासिक त्रिमासिक स्वरूपात भरता येतो.

कसे मिळणार 35 लाख रुपये ?

या योजनेत मासिक 1515 रुपयांची म्हणजेच दररोज साधारणता 50 रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 55 वर्ष सुरू ठेवली तर 31.60 लाख रुपये मिळतात, 58 वर्ष गुंतवणूक केल्यास 33.40 लाख रुपये आणि साठ वर्षे गुंतवणूक केल्यास 34.60 लाख रुपये मिळतात.

या योजनेत पाच वर्षानंतर बोनस मिळत असतो आणि चार वर्षानंतर कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. नक्कीच ही योजना सर्वसामान्य ग्राहकांना मानामाल बनवणारी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News