Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या नागरिकांसाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरेतर, अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण काही असे लोक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफ डी योजना तसेच पोस्टाच्या बचत योजनांना अधिक महत्त्व आहे. यामुळे, जर तुम्हीही तुमचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका सुपरहिट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना पंधरा वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तब्बल 71 लाख रुपये मिळणार आहेत.
कोणती आहे ही योजना ?
खरं तर आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती योजना मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेला सुकन्या समृद्धी योजना असे नाव देण्यात आले असून या अंतर्गत कोणताही भारतीय नागरिक दहा वर्षांच्या आतील मुलींच्या नावाने या योजनेत पैसा गुंतवू शकतो.
यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलींच्या भविष्याची काळजी असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलीचे भविष्य उज्वल बनवायचे असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा पर्याय निवडायला हवा. या योजनेत अडीचशे रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
या योजनेत दरवर्षी कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक करता येते आणि या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकारकडून 8.2% व्याजदराने परतावा दिला जात आहे. म्हणजेच इतर योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर हे अधिक आहे.
योजना भारत सरकारने सुरू केलेली एक बचत योजना आहे. मुलींच्या नावाने यामध्ये पैसे गुंतवले जातात आणि एकूण पंधरा वर्षांसाठी यात गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर मग मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर या योजनेत गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील व्याज दिले जाते.
कसे मिळणार 71 लाख?
जर एखाद्या भारतीय नागरिकांनी आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर त्यांना 21 व्या वर्षी 71 लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्ही पंधरा वर्षासाठी दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणुकीची रक्कम 22 लाख 50 हजार रुपये इतकी होणार आहे.
दरम्यान या जमा रकमेवर तुम्हाला 8.2% व्याजदराने परतावा मिळाल्यास तुम्हाला 49 लाख 32 हजार 119 रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहे. म्हणजेच दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास या योजनेतून 71 लाख 82 हजार 119 रुपये मिळतील.