Post Office Scheme : देशभरातील बँकांकडून आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. मात्र आजही पोस्टाच्या विविध बचत योजनांचे व्याजदर कायम आहेत.
पोस्टाच्या एफडी योजनेचे व्याजदर देखील कमी झालेले नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची एफडी योजना परफेक्ट ठरणार आहे.

पोस्टाच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर पोस्ट ऑफिस कडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते. दरम्यान, आता आपण पोस्टाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहूयात.
कशी आहे पोस्टाची एफडी योजना ?
पोस्टाच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर पोस्ट ऑफिसकडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते. मात्र पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना या नावाने ही योजना चालवते.
पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने,
तीन वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
दोन वर्षांच्या एफडी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
पोस्टाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत सध्या सात टक्के दराने व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना एक लाख 14 हजार 663 रुपये मिळणार आहे.
म्हणजेच सदर गुंतवणूकदाराला 14 हजार 663 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पोस्ट ऑफिसची एफडी योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत गुंतवलेला पैसा हा कुठेच जाणार नाही.