Post Office ची 60 महिन्यांची RD स्कीम मालामाल बनवणार, दरमहा 3100 रुपये जमा केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…

सध्या शेअर मार्केटमध्ये जी घसरण सुरू आहे त्यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीकडे शिफ्ट झाले आहेत. दरम्यान जर तुम्हाला आगामी काळात पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर पोस्टाकडून 60 महिन्यांची म्हणजेच पाच वर्षांची आरडी योजना ऑफर केली जात असून आज आपण याच योजनेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Post Office Scheme : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे आणि याचा फटका शेअर मार्केट मधील असंख्य गुंतवणूकदारांना बसला आहे. म्युच्युअल फंड मध्ये देखील शेअर मार्केट मधील घसरणीचा परिणाम दिसतोय. सध्या शेअर मार्केटमध्ये जी घसरण सुरू आहे त्यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीकडे शिफ्ट झाले आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय पोस्टाच्या एफडी योजनेत आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

दरम्यान जर तुम्हाला आगामी काळात पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर पोस्टाकडून 60 महिन्यांची म्हणजेच पाच वर्षांची आरडी योजना ऑफर केली जात असून आज आपण याच योजनेची माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्टाची पाच वर्षांची आरडी योजना

ज्या लोकांकडे गुंतवणुकीसाठी एक रकमी पैसा उपलब्ध नाही ते गुंतवणूकदार आरडी योजनेत गुंतवणूक करू शकतात. पोस्टाच्या RD योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करता येतो.

पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेत गुंतवणूकदारांना 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तिमाही आधारावर चक्रवाढ व्याजेचा सुद्धा फायदा मिळतो.

या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. महत्त्वाचे म्हणजे कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही. अर्थातच गुंतवणूकदार त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत गुंतवू शकतो आणि एक मोठा फंड तयार करू शकतो.

दरमहा 3100 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला 3100 ची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला दोन लाख 21 हजार 233 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक प्रतिमहा 3100 प्रमाणे एक लाख 86 हजार इतकी राहणार आहे.

आणि उर्वरित रक्कम ही व्याज स्वरूपात गुंतवणूकदाराला रिटर्न म्हणून मिळणार आहे. अर्थातच यातून गुंतवणूकदाराला 35,233 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. मात्र पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दिल्या जाणाऱ्या व्याजात बदल झाल्यास ही रक्कम कमी जास्त होऊ शकते.

परंतु सध्या जे व्याजदर लागू आहेत तेच आगामी पाच वर्षे लागू राहिलेत तर आज रोजी 3100 ची मासिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला पाच वर्षांच्या काळात 35 हजार 233 रुपयांचे व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe