Post Office Scheme : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आरबीआयने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली.
एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी यांसारख्या अनेक प्रमुख बँकांनी एफडी व्याज दरात कपात केली. मात्र आजही पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर कायम आहेत. म्हणूनच आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्ट ऑफिसची एफडी योजना?
पोस्ट ऑफिस कडून टाइम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची FD योजना असं म्हणतात. या पोस्टाच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्षांची आहे.
यातील एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7% दराने, तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
पण ज्याप्रमाणे बँकांच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचे रिटर्न दिले जातात तसे अधिकचे रिटर्न पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत मिळत नाहीत.
तथापि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर इतर काही बँकांच्या तुलनेत अधिक आहेत, म्हणूनच ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग सुद्धा पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. विशेष म्हणजे पोस्टात केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.
24 महिन्यांच्या एफडी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या म्हणजेच 24 महिन्यांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
जर समजा पोस्टाच्या या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदरील ग्राहकाला मॅच्युरिटीवर म्हणजे 24 महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 7 हजार 186 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एका लाखाच्या गुंतवणुकीवर 7186 व्याज स्वरूपात मिळणार आहेत.
जर समजा 24 महिन्यांच्या एफडी योजनेत एखाद्या ग्राहकाने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजे 24 महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळणार आहेत. म्हणजे दोन लाखाच्या गुंतवणुकीवर 29,776 रुपयांचे व्याज मिळणार आहे.