Post Office Scheme : आरबीआयने अलीकडेच रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांकडून एफडीचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. मात्र पोस्ट ऑफिस च्या एफडी योजनेचे व्याजदर आजही कायम आहेत.
यामुळे पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना नक्कीच चांगला फायदा मिळणार आहे. खरे तर पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना चालवली जाते.

पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप अगदीच बँकांचे एफ डी योजनेप्रमाणे आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात आणि आज आपण याच पोस्टाच्या एफडी योजनेचे माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना म्हणजेच एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी एक फायद्याचा पर्याय ठरणार आहे. पोस्ट ऑफिस कडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जात आहे.
यातील एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने,
तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा दिला जात आहे. दरम्यान आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
पोस्टाच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत,
जर एखाद्या ग्राहकाने पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना सध्याच्या 7.50% दराने दोन लाख 89,990 मिळणार आहेत म्हणजेच 89 हजार 990 रुपये फक्त व्याज म्हणून रिटर्न मिळतील. नक्कीच बँकांच्या एफडी योजनेपेक्षा पोस्टाची एफडी योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.