पोस्ट ऑफिसच्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

पोस्टाची ही निश्चित मुदत ठेव (एफडी) योजनेत गुंतवणूक करणे हे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारे एक उत्तम पर्याय मानला जातो. पोस्टाच्या एफडी योजनेला अनेक लोक विशेषतः ज्यांना जोखीम टाळायची आहे, ते प्राधान्य देतात.

Published on -

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसकडून विविध बचत योजना ऑफर केल्या जात आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस चा टाईम डिपॉझिट योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच असते म्हणून याला पोस्टाची FD योजना म्हणूनही ओळखले जाते.

पोस्टाची ही निश्चित मुदत ठेव (एफडी) योजनेत गुंतवणूक करणे हे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारे एक उत्तम पर्याय मानला जातो. पोस्टाच्या एफडी योजनेला अनेक लोक विशेषतः ज्यांना जोखीम टाळायची आहे, ते प्राधान्य देतात.

आता आपण जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिसच्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला किती परतावा मिळेल, हे जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिस एफडी योजनेचे सध्याचे व्याजदर

पोस्ट ऑफिसकडून एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी एफडी योजना ऑफर केली जात आहे. भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या एफडी योजनांसाठी ठराविक कालावधीसाठी व्याजदर निश्चित करते. 2025 मध्ये पोस्ट ऑफिसने 1 वर्षाच्या एफडीवर 6.9% वार्षिक व्याजदर लागू केला आहे.

दोन वर्षांच्या एफडीवर पोस्टकडून सात टक्के दराने, तीन वर्षांच्या एफडीवर पोस्टकडून 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या एफडी वर पोस्टाकडून 7.50% दराने परतावा दिला जात आहे. हा व्याजदर भारत सरकारच्या लघू बचत योजनांनुसार वेळोवेळी बदलू शकतो.

2 लाख रुपयांवर किती परतावा मिळेल?

एखाद्या गुंतवणूकदाराने बारा महिन्यांच्या पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 6.9% दराने बारा महिन्यांनी म्हणजेच एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2 लाख 13 हजार 800 रुपये मिळणार आहेत अर्थातच त्यांना 13,800 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिस एफडीच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्ये

सुरक्षितता: भारत सरकारच्या हमीमुळे पोस्ट ऑफिस एफडी पूर्णतः सुरक्षित आहे.
निश्चित परतावा: बाजारातील चढ-उतारांचा कोणताही प्रभाव नाही.
करसवलत: 5 वर्षांच्या एफडीवर 80C अंतर्गत करसवलत मिळू शकते.
लिक्विडिटी: मुदतीपूर्वी पैसे काढता येतात, पण काही अटी लागू असतात.

पोस्ट ऑफिस एफडी कोणासाठी योग्य आहे?

ही योजना कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त व्यक्तींसाठी तसेच हमी असलेला निश्चित परतावा हवा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याची आहे.

एकंदरीत पोस्ट ऑफिसच्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 6.9% व्याजदराने तुम्हाला एकूण ₹13,800 व्याज मिळेल आणि मुदतीच्या शेवटी ₹2,13,800 रक्कम प्राप्त होईल. सुरक्षित आणि स्थिर परतावा हवा असल्यास, पोस्ट ऑफिस एफडी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe