Post Office ची MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी ठरणार वरदान ! 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम एक फायद्याचा पर्याय ठरणार आहे. MIS ही पोस्टाची एक उच्च व्याजदर असणारी सुरक्षित बचत योजना आहे.

Published on -

Post Office Scheme : आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील विविध बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली. मात्र काही सरकारी बचत योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आजही चांगले व्याज मिळत आहे.

हेच कारण आहे की अनेकजण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. अशा स्थितीत जर तुम्हीही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण आज आपण पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम बाबत माहिती पाहणार आहोत. 

कशी आहे पोस्टाची मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम?

 पोस्ट ऑफिसच्या मधली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर पोस्टाकडून चांगले व्याज ही दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.60% दराने व्याज दिले जात आहे.

मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदारांना कमाल नऊ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते आणि जॉइंट अकाउंट ओपन केल्यास 15 लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जॉईंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त तीन लोकांची नावे जोडता येतात. पोस्ट ऑफिसची मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम ही पाच वर्षांची असते. 

दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

जर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुरुवातीला पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन करा.

यानंतर मग तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये अकाउंट ओपन करावे लागणार आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम अकाउंट ओपन करून तुम्ही यामध्ये पंधरा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये सिंगल अकाउंट ओपन केल्यास तुम्हाला कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास पंधरा लाख रुपये गुंतवता येतात. जर समजा तुम्ही यामध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.60% दराने दरमहा 1,233 रुपये व्याज मिळणार आहे.

ही योजना पाच वर्षांसाठी असते म्हणजेच तुम्हाला सलग पाच वर्ष दोन लाखाच्या गुंतवणुकीतून दरमहा 1233 रुपये मिळतील आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेली रक्कम देखील परत मिळणार आहे. म्हणजेच दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीत 1233×60= 73 हजार 980 रुपयांचे व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!