Post Office च्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 200000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…

पोस्ट ऑफिसच्या सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना म्हणजेच एफडी योजना लाभार्थी ठरणार आहे. दरम्यान आज आपण पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर आरबीआय ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआय कडून रेपो रेट मध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिट च्या व्याजदरात कपात केली जात आहे.

एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा असंख्य बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय.

पण जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल आणि चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी पोस्टाची एफडी योजना कामाची ठरणार आहे कारण की पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांचे व्याजदर अजूनही कायम आहेत. यामुळेच आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्टाची एका वर्षाची एफडी योजना 

खरे तर पोस्ट ऑफिसकडुन टाईम डिपॉझिट योजना नावाची एक बचत योजना सुरू करण्यात आली आहे. या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप अगदीच बँकांच्या एफडी योजनेसारखे आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात.

पोस्टाच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर पोस्ट ऑफिस कडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जात आहे. यातील एक वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने,

दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने, तीन वर्षांच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने रिटर्न दिले जात आहेत.

आता आपण पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

दोन लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आलेल्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत म्हणजेच एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.9% दराने परतावा दिला जात आहे.

आरबीआयच्या निर्णयानंतर अलीकडे देशातील अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली मात्र पोस्टाच्या एका वर्षाच्या एचडी योजनेच्या व्याजदरात कोणताच बदल झालेला नाही.

अजूनही पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेतून गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने परतावा दिला जातोय आणि अशा स्थितीत जर पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 6.9% दराने 2,14,161 रुपये मिळणार आहेत म्हणजे 14,161 रुपये संबंधित ग्राहकाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!