पोस्ट ऑफिसच्या 36 महिन्यांच्या FD योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची प्लॅनिंग आहे का? मग आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेची डिटेल माहिती सांगणार आहोत. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर देशभरातील बँकांनी एफडीच्या जागीदार कमी केले आहेत. मात्र पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांचे आणि फिक्स डिपॉझिट चे व्याजदर आजही कायम आहेत.

यामुळे जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस ची एफडी योजना तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय राहणार आहे. 

कशी आहे पोस्टाची एफडी योजना?

पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आलेल्या टाईम डिपॉझिट योजनेलाच पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते. पोस्टाची एफडी योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे.

पोस्टाच्या विविध एफडी योजनेसाठी लागू असणारे व्याजदर देखील भिन्न आहे. सध्या स्थितीला पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 6.9% दराने व्याज दिले जात आहे.

दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला सात टक्के दराने व्याज दिले जात आहे. तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.10% दराने व्याज दिले जात आहे.  

36 महिन्यांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

पोस्टाच्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेत म्हणजेच तीन वर्षांच्या एफडी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर दोन लाख 47 हजार 15 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच 47 हजार 15 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील. मात्र पोस्टाच्या टीडी योजनेच्या व्याजदरात बदल झाला तर हे कॅल्क्युलेशन सुद्धा बदलणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!