Post Office Scheme : पोस्ट ऑफिस कडून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. आज आपण पोस्टाच्या अशाच एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. पोस्टाकडून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनांप्रमाणेच आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात.
दरम्यान, आता आपण पोस्टाच्या याच टाईम डिपॉझिट योजनेची किंवा एफडी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना काय दराने व्याज मिळते, या योजनेचे स्वरूप कसे आहे, यात किती वर्षांसाठी गुंतवणूक करता येते याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष तसेच पाच वर्ष मुदतीची आहे. मात्र, मुदतीनुसार या योजनेचा व्याजदर बदलतो. एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 6.90% दराने परतावा मिळतोय.
दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला सात टक्के दराने परतावा मिळतोय. तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.10% दराने परतावा दिला जात आहे.
पाच वर्षांच्या एफडी योजनेबाबत किंवा टाइम डिपॉझिट योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.50% दराने परतावा मिळत आहे.
म्हणजेच पाच वर्षांची टाईम डिपॉझिट योजना ही यातील सर्वाधिक व्याजदर ऑफर करणारी आहे. आता आपण याच पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत सहा लाखाची गुंतवणूक केली तर किती परतावा मिळणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
6 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
सध्या पोस्ट ऑफिस कडून पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.50% दराने परतावा दिला जात असून या योजनेत जर एखाद्या ग्राहकाने सहा लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर आठ लाख 69 हजार 969 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीचे सहा लाख रुपये वजा केले असता दोन लाख 69 हजार 969 रुपये हे व्याज स्वरूपात रिटर्न म्हणून मिळणार आहेत.