Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठ्या फायद्याच्या ठरतात. जर तुम्हीही तुमच्याकडील पैसे डबल करण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस च्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत. पोस्ट ऑफिस कडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत.
आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यात दररोज अगदी शंभर रुपयांची गुंतवणूक करूनही गुंतवणूकदारांना चांगला मोठा फंड तयार करता येणार आहे. दररोज शंभर रुपये वाचवून पोस्टाच्या बचत योजनेतून लाखो रुपये कमवता येतील.
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची आरडी योजना. ज्या लोकांना एकाच वेळी बचत योजनेमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करता येणे शक्य नाही अशा लोकांसाठी पोस्टाची ही योजना फायद्याची ठरते. या योजनेत कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून दीर्घकाळात मोठा नफा कमवता येतो.
आतापर्यंत पोस्टाच्या या सुरक्षित बचत योजनेत अनेक लोकांनी गुंतवणूक केली आहे, जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला या योजनेची डिटेल माहिती देणार आहोत. आज आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
कसे आहे पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेचे स्वरूप?
पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.7% व्याजदराने परतावा दिला जातो. यामध्ये जर दिवसाला शंभर रुपये म्हणजेच महिन्याकाठी तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी लाखो रुपयांचा फंड जमा होतो.
दररोज शंभर रुपये अर्थातच महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही एका वर्षात या योजनेत 36 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. पाच वर्षांचा हिशोब केला असता पाच वर्षांच्या काळात तुम्ही या योजनेमध्ये एक लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करणार आहात.
या गुंतवणुकीवर तुम्हाला 6.7% व्याज दराने पाच वर्षांच्या काळात 34 हजार 97 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. प्रतिमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांच्या काळात या योजनेत दोन लाख 14 हजार 97 रुपयांचा मोठा फंड तयार होणार आहे. यामध्ये एक लाख 80 हजार रुपये तुमची गुंतवणूक राहील आणि उर्वरित 34 हजार 97 रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत.