Post Office योजना मध्यमवर्गीयांसाठी गेमचेंजर ! मिडल क्लास लोकांनी ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास काही महिन्यातच त्यांचे पैसे होणार डबल

पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना चालवते. महत्वाचे म्हणजे पोस्टाच्या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते, या गुंतवणुकीला सरकारची गॅरंटी असते. किसान विकास पत्र ज्याला केव्हीपी म्हणून ओळखलं जातं आज आपण याच बचत योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Published on -

Post Office Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. गुंतवणूकदार गोंधळात आहेत. शेअर मार्केट मधील गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या अंगलट आली आहे आणि त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर मार्केट वर आधारित म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे.

म्हणूनच आता सुरक्षित गुंतवणुकीला विशेष पसंती दाखवली जात असून जेव्हा केव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार परताव्याचा विचार केला जातो तेव्हा पोस्ट ऑफिसचं नाव आपसूक आपल्या तोंडावर येत असत. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना चालवते.

महत्वाचे म्हणजे पोस्टाच्या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते, या गुंतवणुकीला सरकारची गॅरंटी असते. दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशाच एका महत्त्वाच्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. किसान विकास पत्र ज्याला केव्हीपी म्हणून ओळखलं जातं आज आपण याच बचत योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पैसे दुप्पट करणारी योजना

मिडल क्लास लोकांसाठी किसान विकास पत्र ही योजना विशेष फायद्याचे ठरणार आहे कारण की या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे काही महिन्यात दुप्पट होतात. किसान विकास पत्र योजनेचे एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला यातून दहा लाख रुपये मिळतात.

या योजनेत आपण कमीतकमी 1000 रुपये अन पुढे 100 च्या पटीत आपल्याला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. अर्थात यामध्ये किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतात. यात आपल्याला पाहिजे तितके पैसे आपण गुंतवू शकता.

ही सरकारी योजना लोकप्रिय करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक करून गुंतवणूकदार 115 महिन्यांमध्ये आपले रक्कम डबल करू शकतात. म्हणजेच ही स्कीम पैसे दुप्पट करणारी योजना आहे.

गुंतवणूकदारांना किती व्याज मिळत ?

पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेंतर्गत सरकार त्रैमासिक आधारावर व्याज ठरवत असते. किसान विकास पत्र योजनेत सध्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यात 10 वर्षांहून अधिक वयाच्या मुलाच्या नावाने खाते उघडले जाऊ शकते.

10 लाखाचे होणार 20 लाख

किसान विकास पत्र योजना आधी 123 महिन्यात परिपक्व होत असे. यानंतर सरकारने हा कालावधी 120 महिन्यांपर्यंत कमी केला. दरम्यान आता ही योजना फक्त 115 महिन्यांमध्ये मॅच्युअर होते. अर्थात ही योजना 115 महिन्यांची असून यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे डबल होतात.

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत आज 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आजपासून पुढील 115 महिन्यात या दहा लाखाचे 20 लाख होणार आहेत म्हणजेच व्याज स्वरूपात त्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत.

सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येत

किसान विकास पत्र योजनेत सिंगल अकाउंट ओपन करता येते सोबत जॉईंट अकाउंट सुद्धा ओपन करता येते. यासोबतच एक गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत कितीही अकाउंट ओपन करू शकतो. यावर कोणतेच निर्बंध नाहीयेत. म्हणजेच गुंतवणूकदार या योजनेत 2, 4, 6, 8 किती अकाउंट ओपन करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe