Post Office Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत आणि म्हणूनच गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरत आहेत. याशिवाय अनेक जण बँकांच्या एफडी योजनांमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत.
पण जर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (TD) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदतीची असते. पोस्टाच्या वेगवेगळ्या मुदतीच्या टीडी योजनेत गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळे व्याजदर लागू आहेत.

टीडी योजनेचे व्याजदर कसे आहेत?
सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 6.90% दराने व्याज दिले जात आहे. दोन वर्षांच्या टाइम डिपॉजिट योजनेत सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत 7.10% दराने व्याज दिले जात आहे आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज मिळत आहे. ही योजना बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच कार्य करते, मात्र येथे सरकारची हमी असल्यामुळे ही गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.
कसे मिळणार पाच लाख 38 हजार रुपयांचे व्याज
पोस्ट ऑफिस चा टाईम डिपॉझिट योजनेतून जर तुम्हाला पाच लाखाकडे हजार रुपयांचे व्याज हवी असेल तर तुम्हाला पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.
पाच वर्षांच्या टीडी योजनेत 12 लाखांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षानंतर 17 लाख 38 हजार 554 रुपये मिळणार आहेत. अर्थात गुंतवणूकदारांना पाच लाख 38 हजार 554 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये कोणती?
या योजनेतून गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. या योजनेत सरकारी हमीमुळे कोणताही जोखीम किंवा धोका नसतो. तसेच, 5 वर्षांच्या TD योजनेत कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते. यात मुदतपूर्व बंद करण्याची सुविधा मिळते. म्हणजे गरज असल्यास ही योजना मुदतपूर्व बंद करता येते, मात्र काही अटी लागू होतात.