Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या तयारीत आहात का? तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, अलीकडील काही महिन्यांमध्ये आरबीआयने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. यावर्षी आरबीआयने रेपो रेटमध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकांनी एफडी व्याजदरात कपात केली आहे.
मात्र आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेचे व्याजदर कायम आहेत. म्हणून सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे कारण की, आज आपण पोस्टाच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम बाबत जाणून घेणार आहोत.
कशी आहे पोस्टाची मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम ?
पोस्टाच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम बाबत बोलायचं झालं तर ही एक पाच वर्षांची योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.4% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दरमहा एक निश्चित व्याज मिळते आणि हे व्याज गुंतवणूकदाराच्या बचत खात्यात वर्ग केले जाते.
या योजनेत तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करावी लागते आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर पोस्टाकडून 7.4 टक्के दराने तुम्हाला व्याज दिले जाते. या योजनेत सिंगल अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदाराला कमाल नऊ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदाराला कमाल 15 लाख रुपये इन्वेस्ट करता येतात.
या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. जॉइंट अकाउंट जास्तीत जास्त तीन प्रोढ व्यक्ती मिळून ओपन करता येते. जॉइंट अकाउंट मध्ये समाविष्ट असणाऱ्यांचा गुंतवणुकीतील वाटा समान असायला हवा.
या योजनेचे खाते उघडल्यानंतर एक महिन्यापासून व्याजाची देयके सुरू होतात आणि परिपक्वता होईपर्यंत सुरू राहतात, या अंतर्गत दरमहा एक निश्चित रक्कम व्याज म्हणून मिळते. या योजनेतून मासिक व्याज काढले नाही तरी त्यावर अतिरिक्त व्याज मिळत नाही.
3 हजाराचे व्याज मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार ?
या योजनेत जर एखाद्या ग्राहकाने सिंगल अकाउंट ओपन करून यात पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 7.4% दराने तीन हजार 83 रुपयांचे मासिक व्याज मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हे व्याजाचे पैसे गुंतवणूकदाराच्या सेविंग अकाउंट मध्ये वर्ग केले जाणार आहेत. म्हणजेच वार्षिक 36,996 रुपये व्याज मिळणार आहे.