Post Office Scheme : अलीकडे अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. मात्र असे असले तरी भारतात आजही लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे अधिक कल आहे. विशेषता ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही बँकेच्या आणि पोस्ट ऑफिस च्या एफडी योजनांवर विश्वास दाखवत आहे.
यामुळे आज आपण पोस्ट ऑफिस च्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर एक दोन तीन आणि पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार याचीच आज आपण माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिसची एफडी योजना?
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेला टाईम डिपॉझिट योजना असे नाव देण्यात आले आहे. काही लोक याला टर्म डिपॉझिट योजना असेही म्हणतात आणि याचे स्वरूप अगदीच बँकेच्या एफडी योजनेप्रमाणे आहे.
बँकेच्या फिक्स डिपॉझिट प्रमाणे या योजनेचे स्वरूप असल्याने याला पोस्टाची एफडी योजना किंवा टीडी योजना म्हणून ओळखल जात अन आज आपण पोस्टाच्या याच एफडी योजनेची किंवा टीडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्टाची टीडी योजना ही एक, दोन, तीन आणि पाच वर्षांची आहे.
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कालावधीनुसार वेगवेगळ्या व्याजदराने परतावा दिला जातोय. एक वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून 6.9% दराने, दोन वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून सात टक्के दराने, तीन वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या टीडी योजनेत पोस्टाकडून 7.50% दराने परतावा दिला जात आहे.
एक लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर म्हणजेच एका वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख सात हजार 81 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 7 हजार 81 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला सात टक्के दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच दोन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 14 हजार 888 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 14 हजार 888 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला 7.10% दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 23 हजार 508 रुपये मिळणार आहेत यामध्ये 23 हजार 508 रुपये हे गुंतवणूकदाराला मिळालेले व्याज राहणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला 7.50% दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 44 हजार 995 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदाराला 44,995 रुपये रिटर्न म्हणून मिळतील.