पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 3 हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? पहा….

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर पोस्ट ऑफिस कडून विविध बचत योजना चालवल्या जातात आणि यामध्ये आरडी योजना सर्वाधिक लोकप्रिय बचत योजना म्हणून ओळखली जाते.

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही दरमहा छोटीशी रक्कम गुंतवून एक चांगला मोठा फंड तयार करू शकता.

आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत. पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये सध्या गुंतवणूकदारांना काय दराने परतावा दिला जात आहे? पोस्टाच्या आरडी योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार? याच संदर्भातील आज आपण तपशीलवार माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्टाच्या आरडी योजनेचे व्याजदर

खरे तर, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अलीकडेच रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच रेपो रेटमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने 0.25 टक्क्यांची कपात केली आणि त्याआधी देखील रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली होती.

म्हणजेच अलीकडील काही महिन्यांमध्येच आरबीआय कडून रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. सध्याचा रेपो रेट हा 6% इतका आहे. रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून होम लोनसहित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर कर्जाच्या व्याजदरात कपात झाली आहे तर दुसरीकडे एफडी आणि इतर बचत योजनांच्या व्याजदरात सुद्धा कपात केली जात आहे. मात्र पोस्टाच्या बचत योजनांमध्ये अजून व्याजदरात कपात करण्यात आलेली नाही ही एक मोठी गोष्ट आहे आणि पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्कृष्ट आहे.

सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक 6.70% व्याजदराने रिटर्न दिले जात आहेत. पोस्ट ऑफिसची आरडी योजना पाच वर्षात परिपक्व होते. या योजनेत दरमहा एक फिक्स रक्कम गुंतवता येते.

ज्या लोकांना एकाच वेळी मोठी रक्कम इन्व्हेस्ट करता येणे अशक्य आहे अशा लोकांसाठी हा पर्याय फारच फायदेमंद असून या योजनेत अनेक सर्वसामान्य लोक गुंतवणूक करतात.

3 हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

जर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला सध्याच्या 6.70% व्याजदराने पाच वर्षांनी म्हणजेच 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 14 हजार 97 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक एक लाख 80 हजार रुपये एवढी राहणार आहे आणि उर्वरित म्हणजेच 34 हजार 97 रुपये त्याला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe