Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना देखील गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट आहेत. पोस्ट ऑफिस कडून विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात असून टाईम डिपॉझिट योजना म्हणजेच टीडी योजना ही देखील पोस्टाची एक लोकप्रिय बचत योजना म्हणून ओळखली जाते.
या योजनेचे स्वरूप अगदीच पोस्टाच्या एफडी योजनेप्रमाणेच असून याला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. दरम्यान आज आपण पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट योजनेतून कशा पद्धतीने गुंतवणूकदार मुद्दल पेक्षा जास्त व्याज मिळवू शकतात याबाबत आढावा घेणार आहोत.

Post Office ची Time Deposit योजना कशी आहे?
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना एक ते पाच वर्षांच्या मुदतीची आहे. पोस्टाकडून एका वर्षाची, दोन वर्षांची, तीन वर्षांची आणि पाच वर्षांची टाईम डिपॉझिट योजना ऑफर केली जाते.
दरम्यान पोस्टाच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना सात टक्के दराने, तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा दिला जात आहे.
मुद्दल पेक्षा जास्त व्याज हवे असेल तर काय करावे लागणार?
जर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनेच्या टाईम डिपॉझिट योजनेतून मुद्दल पेक्षा जास्त व्याज हवे असेल तर यासाठी तुम्हाला 5 वर्षांच्या टीडी योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 5 वर्षांचा काळ पूर्ण होण्यापूर्वी या योजनेला मुदतवाढ देखील द्यावी लागणार आहे. तुम्हाला या योजनेला दोनदा मुदतवाढ द्यायची आहे म्हणजेच तुम्हाला एकूण 15 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.
कसे मिळणार 20 लाख?
तुम्हाला या योजनेतून 20 लाख रुपयांचे व्याज मिळवायचे असेल तर यासाठी 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत 10 लाखांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यात तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत म्हणजे 4 लाख 49 हजार 948 रुपये तुम्हाला व्याज मिळेल.
दरम्यान, तुम्ही या योजनेला आणखी 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिली म्हणजेच 10 वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 21 लाख 2 हजार 349 रुपये मिळतील.
तसेच तुम्ही या योजनेला आणखी 5 वर्षांसाठी मदत वाढ दिली म्हणजेच पंधरा वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 30 लाख 48 हजार 297 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 20 लाख 48 हजार 297 रुपये तुम्हाला फक्त व्याज म्हणून मिळणार आहेत.