60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना ‘ही’ योजना दरमहा देणार 6150 रुपयांचे व्याज ! गुंतवणूक किती करावी लागेल ?

सरकारच्या विविध बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या Senior Citizen Savings Scheme - SCSS अर्थातच जेष्ठ नागरिक बचत योजनेला मोठे महत्त्व आहे. ही योजना विशेषतः निवृत्त नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये नियमित आणि सुरक्षित परतावा मिळतो.

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात आजही बँकेच्या एफडी योजनांमध्ये आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो. दरम्यान, जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 6150 रुपयांपर्यंतचे व्याज मिळणार आहे.

खरेतर, सरकारच्या विविध बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या Senior Citizen Savings Scheme – SCSS अर्थातच जेष्ठ नागरिक बचत योजनेला मोठे महत्त्व आहे. ही योजना विशेषतः निवृत्त नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये नियमित आणि सुरक्षित परतावा मिळतो.

विशेष म्हणजे, या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ₹6,150 पर्यंत व्याज मिळू शकते. या योजनेत फक्त सीनियर सिटीजन ग्राहक गुंतवणूक करू शकतात. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना यामध्ये गुंतवणूक करता येते. 

SCSS योजनेचे वैशिष्ट्ये

जेष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. निवृत्त व्यक्तींसाठी ही एक सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. सेवानिवृत्तीनंतर नागरिक यामध्ये एकरकमी पैसा गुंतवून चांगला लाभ मिळवू शकतात.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 8.2 टक्के वार्षिक व्याजदराने परतावा दिला जात आहे. यामध्ये कमीत कमी एक हजार रुपयांची आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

ही योजना पाच वर्षांसाठीची आहे, मात्र याला तीन वर्षांची अतिरिक्त मुदत वाढ मिळू शकते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत उपलब्ध आहे, IT सेक्शन 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहे.

दरमहा 6,150 कसे मिळणार ?

जर एखाद्या व्यक्तीने SCSS योजनेत ₹9 लाख गुंतवले, तर 8.2% वार्षिक व्याजदरानुसार त्याला दरमहा सुमारे ₹6,150 व्याज मिळेल.

➡ गुंतवणूक: ₹9,00,000

➡ वार्षिक व्याज: 8.2%

➡ वार्षिक परतावा: ₹73,800

➡ मासिक व्याज: ₹6,150

जर तुम्ही जास्त रक्कम गुंतवली, तर तुम्हाला अधिक व्याज मिळू शकते. उदाहरणार्थ, जास्तीत जास्त ₹30 लाख गुंतवल्यास दरमहा सुमारे ₹20,500 पर्यंत व्याज मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe