Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक वर्षापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना बँकांच्या एफडी योजनांपेक्षा अधिकचे व्याजदर मिळणार आहे.
पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांना 10 लाख रुपये इन्वेस्ट करून तब्बल 44 लाख रुपये मिळवता येणार आहेत. मंडळी, आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत त्याला पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना म्हणून ओळखली जाते.

दरम्यान आता आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर, या योजनेचे स्वरूप आणि या योजनेत दहा लाख रुपये इन्वेस्ट करून कशा पद्धतीने 44 लाख रुपयांचा निधी तयार करता येणार ? याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेला सरकारची हमी असून यामध्ये दिले जाणारे व्याजदर हे बँकांच्या एफडी योजनांपेक्षा अधिकचे आहे.
पण, या योजनेचे स्वरूप बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच असल्याने याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही एका वर्षाच्या मुदतीसह, दोन वर्षांच्या मुदतीसह, तीन वर्षांच्या मुदतीसह आणि पाच वर्षांच्या मुदतीसह येते. पण वेगवेगळ्या मुदतीच्या टाईम डिपॉझिट योजनेसाठी वेगवेगळे व्याजदर सुद्धा लागू आहेत.
पोस्टाच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना 6.9% दराने परतावा दिला जातो, दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना सात टक्के दराने परतावा दिला जातो तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा दिला जातो आणि पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा दिला जात आहे. आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत दहा लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून कशा पद्धतीने 44 लाख रुपयांचा फंड जमा करता येऊ शकतो याचे गणित समजून घेऊयात.
मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत सध्या 7.50% दराने परतावा दिला जात असून आयकर अधिनियम 80 सी अंतर्गत कर लाभ देखील मिळतो. याशिवाय, पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना एक्सटेंड करता येते. यासाठी जेव्हा 5 वर्षे संपतील तेव्हा आपल्याला आपल्या एफडीचे नूतनीकरण करावे लागेल.
मंडळी, जर समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या टीडी योजनेत म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेत 10 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 5 वर्षांनी 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 4 लाख 49 हजार 948 रुपये तुम्हाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
जर तुम्ही ही रक्कम आणखी पाच वर्षांसाठी गुंतवली तर तुम्हाला 10 वर्षांत 21 लाख 2 हजार 349 रुपये मिळणार आहेत यातील 11 लाख 2 हजार 349 इतकी रक्कम व्याजाची राहणार आहे. पण तुम्हाला जर यातून आणखी लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही आणखी पाच वर्षांसाठी या योजनेला मुदतवाढ देऊ शकतात म्हणजेच 15 वर्षांसाठी तुम्ही यात गुंतवणूक करू शकतात, मग 15 वर्षांनी तुम्हाला यातून 31 लाख 50 हजार 646 मिळणार आहेत.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आणखी पाच वर्षांसाठी म्हणजेच टोटल 20 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक होल्ड करू शकता अन मग तेव्हा तुम्हाला यातून 44 लाख 19 हजार 872 रुपये मिळणार आहेत. एकंदरीत पोस्टाच्या 5 वर्षांच्या टीडी योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास अन 5 वर्षांनी मुद्दल तसेच व्याजाची रक्कम पुन्हा यात गुंतवली अन ही प्रक्रिया 20 वर्षांपर्यंत कायम ठेवली तर तुम्हाला यातून 44 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.