पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनेत एकदा पैसे गुंतवा अन महिन्याकाठी कमवा 5550 रुपये ! वाचा सविस्तर

Post Office Scheme : बचतीबाबत आता लोक फारच जागरूक झाले आहेत. आता प्रत्येकजण गुंतवणूकीला विशेष प्राधान्य देत आहे. खरेतर अलीकडे गुंतवणूकीसाठी विविध ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट, Mutual Fund अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे. तसेच सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक महत्व दिले जात आहे.

याचे कारण म्हणजे येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत तेथील परताव्याचा आकडा बहुतेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त आहे.

आम्ही ज्या बचत योजना बाबत बोलत आहोत ती योजना आहे पोस्टाची मासिक उत्पन्न योजना, ज्यामध्ये एकरकमी ठेवीवर दरमहा उत्पन्न मिळते. म्हणजेच या योजनेत एकदा पैसे गुंतवावे लागतात आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित परतावा मिळतो.

कसे आहे पोस्टाच्या MIS योजनेचे स्वरूप

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉईंट अकॉउंट ओपन करू शकता. यातील सिंगल अकाउंट मध्ये 9 लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट मध्ये 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकता. ही योजना पाच वर्षांसाठी असते.

तुमची एकूण मूळ रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत केली जाईल. पण तुमची इच्छा असल्यास यातील गुंतवणूक आणखी 5-5 वर्षांसाठी पुढे लांबवली जाऊ शकते. दर 5 वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय तुम्हाला दिला जाणार आहे.

या खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. मात्र, तुमच्या हातात येणारे व्याज करपात्र असते याची काळजी घ्यायची आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची गरज असल्यास, तुम्हाला ही सुविधा एका वर्षानंतर मिळते, पण त्यापूर्वी रक्कम काढायची असेल, तर ते शक्य नाही.

तथापि, एक वर्षानंतर प्री-मॅच्युअर क्लोजरसाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेच्या 2% रक्कम वजा केली जाईल अन रक्कम परत केली जाणार आहे.

9 लाख रुपये जमा केल्यास दर महिना मिळणार 5 हजार 550 रुपये

या योजनेत एकदा नऊ लाख रुपये जमा केल्यास गुंतवणूकदाराला 7.4% या दराने पाच वर्षांनी तीन लाख 33 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 5 हजार 550 रुपये एवढी रक्कम व्याज स्वरूपात मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe