Post Office ची जबरदस्त योजना ! ‘या’ योजनेत तुमच्या पत्नीसोबत एकदा गुंतवणूक करा, एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळणार

Published on -

Post Office Scheme : देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसने अनेक बचत योजना सुरु केल्या आहेत.

विशेष म्हणजे यावर्षी बँकांच्या एफडी योजनांच व्याजदर कमी झालेले असतानाही या बचत योजनांचे व्याजदर कायम राहिलय. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक लोकप्रिय योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

पोस्टाची मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme – MIS) गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच चर्चेत राहते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला ठराविक रक्कम व्याजाच्या स्वरूपात मिळते, त्यामुळे नियमित उत्पन्नाचा स्थिर स्रोत निर्माण होतो.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जोखमीची भीती नाही, कारण या योजनेला भारत सरकारची हमी आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत सुरक्षित पर्याय मानली जाते. फक्त १००० रुपयांपासून खाते उघडता येते आणि गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षांचा असतो.

या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो. व्यक्ती स्वतःचे खाते (सिंगल अकाउंट) किंवा पत्नीसोबत मिळून जॉइंट अकाउंट देखील उघडू शकतो. सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवणूक करता येते.

सध्या पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेवर ७.४० टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. या दरानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने १५ लाख रुपये जॉइंट अकाउंटमध्ये गुंतवले,

तर त्याला दर महिन्याला ९,२५० रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळतील. त्याचप्रमाणे, ९ लाख रुपये सिंगल अकाउंटमध्ये गुंतवल्यास, दर महिन्याला सुमारे ५,५०० रुपये व्याज मिळते.

मॅच्युरिटीच्या शेवटी गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळते आणि हवे असल्यास पुन्हा खाते रिन्यू करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे निवृत्त व्यक्ती, नियमित उत्पन्न शोधणारे नागरिक किंवा कमी जोखमीचे गुंतवणूकदार यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही उत्तम आणि खात्रीशीर योजना ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe