पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! गुंतवणूकदारांना मिळणार 2 लाख 24 हजार रुपयांचे व्याज, पहा डिटेल्स

Post Office मध्ये सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही स्कीम फायद्याची ठरणार आहे. ही पाच वर्षांची बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एफडी पेक्षा अधिकचा परतावा दिला जातोय. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.7% वार्षिक व्याजदराने रिटर्न दिले जात असून आत्तापर्यंत या योजनेचा अनेकांनी लाभ घेत गुंतवणूक केली आहे. यामुळे जर तुमचाही सुरक्षित गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही योजना एक बेस्ट प्लॅन ठरणार आहे.

Published on -

Post Office Scheme : अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. मात्र असे असले तरी आजही देशातील एक मोठा वर्ग सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतो आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही भारतात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना विशेष महत्त्व आहे.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका भन्नाट बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना तब्बल 2 लाख 24 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून विविध वर्गातील नागरिकांसाठी योजना राबवल्या जात आहेत.

पण जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असेल आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट म्हणजेच एनएससी ही योजना फायद्याची ठरणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले व्याज दिले जात आहे.

दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने दोन लाख 24 हजार रुपयांचे व्याज मिळणार याचेही कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेणार आहोत.

कशी आहे पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही एक पाच वर्षांची योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.7% दराने परतावा दिला जातोय. महत्त्वाचे म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस आकारला जात नाही.

म्हणून जर तुम्हाला करमुक्त उत्पन्न हवं असेल तर हा एक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. पोस्ट ऑफिस एनएससीमध्ये, आपल्याला एफडी सारखें चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो, यामुळे आपले पैसे वेगाने वाढतात.

या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते, सर्वाधिक गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच गुंतवणूकदार त्याच्याकडे असणारे सर्व पैसे या योजनेत गुंतवू शकतो आणि चांगला नफा मिळवू शकतो.

एनएससीमध्ये गुंतवणूकीवर, आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सूट आहे. तथापि, ही सूट केवळ 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर उपलब्ध आहे. पहिल्या 4 वर्षांसाठी, एनएससी कडून प्राप्त व्याज पुन्हा जोडले जाते, म्हणून कर सूट दिली जाते.

तथापि, एनएससी योजनेचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना ही योजना एक्सटेंड करता येत नाही. म्हणून व्याजातून मिळालेल्या कमाईवर इन्कम टॅक्स स्लॅब दरानुसार कर आकारला जातो. व्याज रकमेवर टीडीएस आकारले जात नाही.

कसे मिळणार दोन लाख 24 हजाराचे व्याज

जर एखाद्या ग्राहकाने या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर सात लाख 24 हजार 517 रुपये मिळणार आहेत. अर्थातच संबंधित गुंतवणूकदाराला व्याज म्हणून दोन लाख 24 हजार 517 रुपये रिटर्न मिळणार आहेत. यामुळे ज्या नागरिकांना पाच वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe