पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! 2.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतुन मिळणार 5 लाख

सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या पैसे दुप्पट करणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेची माहिती पाहणार आहोत.

Updated on -

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दाखवले जाते.

बँकांच्या एफडी योजनांप्रमाणेच पोस्टाच्या बचत योजनांना देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्राधान्य दाखवले जाते. दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाचे राहणार आहे.

कारण की आज आपण पोस्टाच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे डबल करणारी ही योजना सध्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनलेली आहे.

पोस्टाची ही योजना ग्राहकांसाठी ठरणार फायद्याची

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची TD योजना. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्टाची फिक्स डिपॉझिट योजना म्हणूनही ओळखली जाते.

पोस्टाची एफडी योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. पोटाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7% दराने,

तीन वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने आणि पाच वर्षे एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने रिटर्न दिले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे पोस्टाच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेतून गुंतवणूक करून गुंतवणूकदार आपली रक्कम दुप्पट करू शकतात.

2.5 लाखाच्या गुंतवणुकीतुन मिळणार 5 लाख

जर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली आणि दर चार महिन्यांनी चक्रवाढ करून 7.5% वार्षिक परतावा मिळवला, तर तुमचे पैसे प्रत्यक्षात 10 वर्षांपेक्षा थोडे लवकर दुप्पट होतील.

चक्रवाढ व्याजाच्या फायद्यामुळे, अंदाजे 9.6 वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होताना दिसेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेत अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली

आणि याला पुन्हा एकदा पाच वर्षांची मुदत वाढ दिली म्हणजेच एकूण 10 वर्षांसाठी जर तुम्ही या योजनेत अडीच लाख रुपये गुंतवून ठेवले तर तुम्हाला 7.5% दराने एकूण पाच लाखापेक्षा अधिकचे रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe