Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? अहो, मग तुमच्यासाठी पोस्टाची योजना फायद्याची ठरणार आहे. खरंतर भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. अधिकचा परतावा मिळवण्यापेक्षा कमी परतावा मिळवायचा पण आपण गुंतवलेले आपले कष्टाचे पैसे कुठेच वाया जाणार नाहीत ही भारतीयांची मानसिकता.
त्यामुळे आजही भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत बहुतांशी लोक पोस्ट ऑफिसच्या बचत योजना किंवा बँकांच्या एफडी योजनांमध्ये पैसे गुंतवताना दिसतात. दरम्यान, जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीवर विश्वास ठेवून असाल अन सुरक्षित गुंतवणुकीसाठी एखादी परफेक्ट योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे.

मित्रांनो, आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थातच पीपीएफ योजनेची माहिती पाहणार आहोत. पीपीएफ योजनेत दररोज 70 रुपये गुंतवून कशा पद्धतीने 6 लाख रुपयांचा फंड जमवता येईल याच बाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आज आपण समजून घेणार आहोत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना कशी आहे?
पीपीएफ योजना गुंतवणूकदारांसाठी एक परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा ऑप्शन फारच कामाचा आहे. ज्या लोकांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असते असे लोक पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतात.
पीपीएफ योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेचे अकाउंट तुम्ही पोस्टात किंवा बँकेत ओपन करू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक किमान पाचशे रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
म्हणजेच दरवर्षी तुम्ही या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. यापेक्षा जास्त रक्कम या योजनेत गुंतवता येत नाही. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा 15 वर्षांचा असतो.
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.10% दराने परतावा दिला जात आहे. आता आपण या योजनेत दररोज 70 रुपयांची बचत करून गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना पंधरा वर्षांनी किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
70 रुपयांची बचत बनवणार लखपती !
तुम्ही दररोज 70 रुपयांची बचत केली आणि यामध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही एका वर्षात 25 हजार रुपये गुंतवणूक करणार आहात. म्हणजेच तुम्ही दरवर्षी या योजनेत 25,000 ची गुंतवणूक सुरू केली तर पंधरा वर्षांच्या काळात तुम्ही यात 3 लाख 75 हजार रुपयांची गुंतवणूक कराल आणि यावर तुम्हाला 7.10% दराने सहा लाख 78 हजार 35 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेतून तुम्हाला तीन लाख 3 हजार 35 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.