Post Office Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण अशा या स्थितीत देखील अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवत आहे. शेअर मार्केट आणि म्युचल फंड मधील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते, म्हणून बहुतांशी लोक येथे गुंतवणुकीला प्राधान्य देत नाही.
या ऐवजी बँकांच्या एफडी योजनेत आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक केली जाते. पण गेल्या काही दिवसांमध्ये बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर कमी झाले आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसलाय. तर दुसरीकडे पोस्ट ऑफिस आजही आपल्या बचत योजनांवर चांगले व्याज देते.

अशा स्थितीत जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल पण कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हे सुचत नसेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण पोस्टाच्या 5 सुपरहिट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
या आहेत पोस्टाच्या सुपरहिट योजना
किसान विकास पत्र : किसान विकास पत्र ही पोस्टाची एक लाखप्रिय बचत योजना. या योजनेत गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.5% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 115 महिन्यांचा म्हणजेच 9 वर्ष आणि सात महिन्यांचा आहे.
या योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर दहा लाख रुपये मिळतात. म्हणजेच ही योजना गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुप्पट करणारी आहे. कारण की यावर गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
यामध्ये कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही. मात्र या योजनेतून मिळणाऱ्या रकमेवर कर लाभ मिळत नाही.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट : या यादीत नॅशनल सेविंग सर्टिफिकेट चा देखील समावेश होतो. ज्या लोकांना कर लाभ हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची राहील. या योजनेचा लॉक इन पिरियड हा पाच वर्षांचा आहे. अर्थात ही योजना पाच वर्षांनी मॅच्युअर होते. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक 7.7% दराने व्याज दिले जाते.
यामध्ये देखील किसान विकास पत्र प्रमाणे कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही. यामध्ये गुंतवलेल्या दीड लाख रुपयांवर कलम 80 सी अंतर्गत कर सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : वर नमूद केलेल्या दोन्ही योजनांपेक्षा ही योजना थोडीशी भिन्न आहे. कारण म्हणजे या योजनेत फक्त सीनियर सिटीजन ग्राहकांना गुंतवणूक करता येते. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि त्यांना वार्षिक 8.2 टक्के दराने व्याज दिले जाते.
या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड पाच वर्षांचा आहे आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर ही योजना तीन वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. या योजनेतून मिळणारे व्याज तीन महिन्यानंतर थेट तुमच्या खात्यात वर्ग केले जाते.
सुकन्या समृद्धी योजना : ही भारत सरकारची बचत योजना आहे आणि मुलींसाठी डिझाईन करण्यात आली आहे. तुमच्या कुटुंबात दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली असतील तर त्यांच्या नावाने तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत मुलींच्या नावाने गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 8.2 टक्के दराने व्याज मिळवू शकता.
या योजनेत वार्षिक म्हणजे एका वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. अकाउंट ओपन केल्यानंतर 21 वर्षांनी किंवा मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर ही योजना मॅच्युअर होते. या योजनेत गुंतवलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF : ही भारत सरकारची एक पूर्णपणे सुरक्षित बचत योजना आहे. ज्या लोकांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जाते. प्रत्येक तीन महिन्यांनी या योजनेचे व्याजदर बदलतात.
एका वर्षात किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक पाच-पाच वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढवता येतो. या योजनेत केलेली गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते.