Post Office Scheme: भविष्याचा विचार करुन अनेकजण विविध योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळेच पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप लोकप्रिय होत आहेत. पोस्ट ऑफीसच्या योजना केंद्र सरकारच्या आखत्यारितील असल्याने त्यांत कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 50 रुपये देऊन, तब्बल 35 लाखांचा निधी तयार करता येतो.
नेमकी काय आहे योजना?
ग्राम सुरक्षा योजना ही एलआयसीसारखी योजना आहे. यात तुम्हाला वयाच्या 80 व्या वर्षी 35 लाख रुपये मिळतात. यासाठी तुम्हाला रोज किमान 50 रुपये गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही 19 व्या वर्षी ही योजना घेतली तर तुम्हाला त्यासाठी 1515 रुपये प्रिमिअम भरावा लागेल. हा प्रिमियम तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिकही भरता येतो. तो तुम्हाला वयाच्या 55 वर्षांपर्यंत भरावा लागेल. त्यानंतर 80 व्या वर्षी तुम्हाला ही रक्कम मिळेल. जर प्रिमिअम धारकाचा त्यापूर्वी मृत्यू झाला तर वारसाला ही रक्कम दिली जाते.

बोनसही मिळतो
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चार वर्षांनी कर्ज सुविधा मिळते. जर पॉलिसीधारकाला पॉलिसी परत करायची असेल तर तो पॉलिसी सुरू झाल्यापासून तीन वर्षांनी ती परत करू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीवर पाच वर्षांनी बोनस देखील मिळतो. म्हणजेच या योजनेच बोनसची सुविधाही देण्यात आली आहे.
कसा मिळतो परतावा?
कोणत्याही पात्र व्यक्तीने या योजनेत दरमहा 1500 रुपये जमा केले तर योजनेच्या मुदतपूर्तीनंतर ३५ लाख रुपयांपर्यंत परतावा मिळतो. गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या कालावधीत परिपक्वतेवर 31,60,000 रुपये, 58 वर्षांच्या कालावधीत परिपक्वतेवर 33,40,000 रुपये आणि 60 वर्षांच्या कालावधीत 34.60 लाख रुपये मिळतील.