Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ज्याला काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यामुळे अनेक जण आता सुरक्षित गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकेच्या एफडी योजनांमध्ये आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातोय. दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून अवघ्या साठ महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना दोन लाखाहून अधिकचे व्याज मिळणार आहे.

कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे टाईम डिपॉझिट योजना ज्याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. पोस्टाची ही एफडी योजना वेगवेगळ्या मुदतीची असते.
एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना पोस्टाकडून ऑफर केली जात आहे. यतिप पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट (TD) योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि आकर्षक परतावा मिळतो.
सरकारच्या समर्थनामुळे ही योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते. सध्या या योजनेवरील वार्षिक व्याजदर 7.5% आहे, जो व्याजदर दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन केला जातो. म्हणजेच प्रत्येक तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता असते.
5 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ₹5,00,000 पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवले, तर चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने त्याला मुदतीच्या शेवटी ₹7,19,428 मिळतील. म्हणजेच, त्याला एकूण ₹2,19,428 चा नफा होईल.
या योजनेची खासियत म्हणजे व्याजदर स्थिर राहतो, त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा परिणाम गुंतवणुकीवर होत नाही. तसेच, कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत करसवलत देखील मिळू शकते.
यामध्ये मुदतपूर्व बंद करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी, त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू आहेत. ही योजना मुदतपूर्व बंद केल्यास पेनल्टी सुद्धा भरावी लागते. भारतीय पोस्ट ऑफिसची ही योजना दीर्घकालीन आणि स्थिर परताव्यासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते.
विशेषतः, ज्या गुंतवणूकदारांना रिस्क-फ्री गुंतवणूक हवी आहे आणि निश्चित परताव्याचा भरोसा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना योग्य ठरते. पोस्ट ऑफिस चा टाईम डिपॉझिट योजनेत महिलावर्ग आणि सिनिअर सिटीजन ग्राहक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत असल्याचे दिसते.