पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! फक्त 5 वर्षात मिळणार 7,24,974 रुपयांचा परतावा, किती गुंतवणूक करावी लागणार ?

तुम्हीही आगामी काळात पोस्ट ऑफिस च्या बचत योजनेत मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. जर तुम्ही आपली बचत सुरक्षितपणे वाढवण्याचा विचार करत असल्यास, पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत ज्यातून प्रत्येक वर्गातील लोकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूकीची संधी मिळते. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात पोस्ट ऑफिस च्या बचत योजनेत मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

जर तुम्ही आपली बचत सुरक्षितपणे वाढवण्याचा विचार करत असल्यास, पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. यामध्ये आपण केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

या योजनेत गुंतवणूक करून पाच वर्षानंतर सात लाख 24 हजार 974 रुपयांपर्यंतचा परतावा सुद्धा मिळवू शकता. दरम्यान आता आपण पोस्टाची ही भन्नाट योजना नेमकी आहे तरी कोणती याबाबत माहिती पाहूयात.

कोणती आहे ती योजना?

पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे. याला पोस्टाची टीडी योजना किंवा एफडी योजना म्हणूनही ओळखतात. कारण असे की याचे स्वरूप बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे.

हे एक असे गुंतवणूक माध्यम आहे ज्यामध्ये निश्चित कालावधीनंतर व्याजासह संपूर्ण रक्कम प्राप्त केली जाते. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत, गुंतवणूकदार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकतात.

पोस्टाच्या टीडी योजनेचा व्याजदर काय?

पोस्टाच्या एक वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूकदारांना 6.9% दराने दोन वर्षाच्या योजनेत सात टक्के दराने तीन वर्षाच्या योजनेत 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या योजनेत 7.50% दराने परतावा मिळतो.

यात किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. दरम्यान आता आपण पोस्टाच्या या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार हे समजून घेणार आहोत.

5 लाखाची गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळणार?

पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत ग्राहकांनी गुंतवणूक केल्यास त्यांना 7.50% दराने मॅच्युरिटी वर सात लाख 24 हजार 974 रुपये मिळणार आहेत.

अर्थातच दोन लाख 24 हजार 974 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील. म्हणजेच पोस्टाच्या या एफडी योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर ग्राहकांना दोन लाख पंचवीस हजार रुपयांची कमाई होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe