Post Office Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असून अनेक जण आता शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे यासोबतच पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट योजनेत देखील मोठी गुंतवणूक केली जात आहे.

पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे स्वरूप अगदीच एफ डी योजनेसारखे असल्याने याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान आज आपण पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना ही वेगवेगळ्या मुदतीची आहे. पोस्ट ऑफिसकडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे.
यातील एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत पोस्टाकडून 6.90% दराने, दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7% दराने, तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
3 वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत 5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिस च्या तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत सध्या स्थितीला 7.10% दराने परतावा दिला जातोय. अशा स्थितीत जर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर 7.10% दराने सहा लाख सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच गुंतवणूकदाराला एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात पोस्टाच्या या योजनेतून तीन वर्षांच्या काळातच 1 लाख 6 हजार 500 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
आरबीआयच्या निर्णयानंतर व्याजदरावर परिणाम होणार
आरबीआय ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. आरबीआय ने रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.
यामुळे होम लोन सहित सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कपात झाली असून याचा परिणाम म्हणून एफडीच्या व्याजदरात देखील कपात होईल अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.