Post Office TD Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. देशातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत म्हणजेच टीडी योजनेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही अगदीच एफडी योजनेसारखी असते आणि यामुळे या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची असते. दरम्यान, आज आपण याच पोस्टाच्या TD योजनेची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पोस्टाची टीडी योजना कशी आहे?
पोस्ट ऑफिसच्या एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 6.9% दराने व्याज दिले जाते. दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सात टक्के दराने व्याज दिले जाते.
तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जाते. तसेच, पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिसच्या 60 महिन्याच्या एफडी योजनेत सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या 60 महिन्यांच्या एफडी योजनेत म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला आठ लाख 69 हजार 969 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच या योजनेत सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दोन लाख 69 हजार 969 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने सात महिन्यांच्या टीडी योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत. अर्थातच दहा लाखांची गुंतवणूक केल्यास चार लाख 49 हजार 948 रुपये रिटर्न मिळणार आहेत.