PPF Scheme : पीपीएफ ज्याला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणून ओळखले जाते, ही पीपीएफ योजना गुंतवणुकीची एक सुरक्षित अन सरकारी योजना आहे. या योजनेला सरकारची गॅरंटी आहे, म्हणून या योजनेत गुंतवलेला पैसा कुठेचं जात नाही.
हेच कारण आहे की, ज्यांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची आहे असे लोक या योजनेला विशेष महत्त्व दाखवतात. अशा परिस्थितीत, आज आपण सरकारच्या या पीपीएफ योजनेची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीपीएफ योजनेत गुंतवणूक करायची असेल तर अकाउंट कुठे ओपन करावे लागणार, पीपीएफ योजनेत कमाल किती गुंतवणूक केली जाऊ शकते, वार्षिक 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार, या योजनेचे सध्याचे व्याजदर अशा विविध बाबींची आज आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
कशी आहे पीपीएफ योजना ?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही भारत सरकारची एक सुरक्षित गुंतवणुकीची योजना असून यामध्ये अनेकांनी गुंतवणूक केलेली आहे. लॉंग टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी ही योजना एक उत्कृष्ट योजना म्हणून ओळखली जाते आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.10% दराने परतावा दिला जातोय.
या योजनेत ग्राहकांना वार्षिक किमान 500 रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. म्हणजे गुंतवणूकदार दरवर्षी या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकतात. यापेक्षा अधिकची रक्कम मात्र यामध्ये गुंतवता येत नाही.
ही योजना पंधरा वर्षांची आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा बँकेत जाऊन पीपीएफ योजनेच अकाउंट ओपन करून यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.
वार्षिक 30 हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
जर तुम्ही पीपीएफ योजनेत वार्षिक 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी तुम्हाला म्हणजेच मॅच्युरिटी वर आठ लाख 13 हजार 642 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तीन लाख 63 हजार 642 रुपये हे तुम्हाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत आणि उर्वरित पैसे ही तुमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे.
म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षात चार लाख 50 हजार रुपये गुंतवणार आहात. नक्कीच जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी योजना एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.